● स्थानिक गुन्हे शाखेची कारवाही
वणी वृत्तवेध:- यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंद्याचे संपुर्ण उच्चाटन व्हावे याकरिता तसेच तसेच यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ विकले जाणार नाहीत याबाबत मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता यांनी सर्व ठाणेदार यवतमाळ जिल्हा व पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते

त्यानुसार पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसापासुन MD(Mepthedrone) ड्रग (Synthetic Durg) हा काही तरुण नशा करत आहेत अशी गोपनिय माहिती प्राप्त करण्याबाबत अधिनस्त पथकांना आदेश दिले होते.आज दिनांक १८ एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी येथे हजर असतांना पथकास गोपनीय खबर मिळाली की, इसम नामे राहुल ठाकुरवार, रा. वणी हा देशमुख वाडी जवळ बस स्थानकाचे मागील बाजुस जाणारे रोडवर MD (Mepthedrone) नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे दृष्टीने घेवुन येणार आहे.

अशा माहिती वरुन पथकाने माहिती बाबत वरिष्ठांना कल्पना देवुन छापा कारवाई कायदेशीर पुर्तता करुन देशमुख वाडी जवळ बस स्थानकाचे मागील बाजुस जाणारे रोडजवळ जावुन समोर सापळा लावुन थांबले असता एक इसम त्याचे जवळील मोपेड काळ्यारंगाची विना क्रमांकाची दुचाकी थाबुन दिसला व त्याचे जवळ दुसरा इसम जवळ थाबलेला दिसला


पो. स्टाफ चे मदतीने त्यास थांबवुन इसमाना नाव विचारले असता १) राहुल दिलीप ठाकुरवार वय ४० वरक्ष रा. लायन्स स्कुल जवळ देशमुख वाडी वणी ता. वणी, २) प्रितम लिलाराम केशवाणी वय ४४ वर्ष रा. गुरुनानक नगर सिधिं कॉलणी वणी असे सांगीतले. त्यानंतर पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कडुन MD (Mepthedrone) २१ ग्रॅम १८ मिली ग्रॅम किमंत १,२७,०८०/- रु व नगदी, मोबाईल, मोपेड गाडी असा एकुण २,३०,४४०/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीतांविरुध्द पो. ठाणे वणी येथे एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही कामी पो.स्टे.वणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. यांचे मार्गदर्शनात सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यवतमाळ, पोलीस निरिक्षक गोपाल उंबरकर पो.स्टे. वणी, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, पोहकों/ सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, पोकॉ/ सलमान शेख, रजनिकांत मडावी, चपोना/ सतिष फुके यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.









