Home Social वणी लायन्स कॉलेजचा उत्कृष्ठ निकाल

वणी लायन्स कॉलेजचा उत्कृष्ठ निकाल

◆मानसी लिपटे प्रथम

वणी वृत्तवेध : येथील वणी लायन्स इंग्लिश मिडीयम (विज्ञान) ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता १२ वी (एच.एस.सी.) फेब्रुवारी २०२६ परीक्षेचा निकाल ९४.४४ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या निकालात कु.मानसी भारत लिपटे हिने ७९.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. कुमुदिनी हेमंत जोगी हिने ६३.३३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर रोशन तुकाराम माथनकर याने ६१.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, संचालक शमिम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे तसेच प्राचार्या चित्रा देशपांडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleविद्यार्थ्यां प्रवेशासाठी शिक्षकांची धाव धाव
Next articleखत खरेदीत ‘लिंकिंग’ केल्यास गाठ मनसेशी
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे