Home Breaking News एसपीएम ची आरोही ढेंगळे तालुक्यातून प्रथम

एसपीएम ची आरोही ढेंगळे तालुक्यातून प्रथम

◆ लायन्सचा अनिकेत तुराणकर द्वितीय
◆ तालुक्याचा निकाल ८५.९४ टक्के

वणी वृत्तवेध :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून शि.प्र.मंडळ विद्यालयाची विद्यार्थीनी आरोही प्रमोद ढेंगळे हीने ९८.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर लायन्स ईंग्लिश मिडीयम स्कुलचा अनिकेत मधुकर तुरानकर हा ९६.६० टक्के गुण घेऊन द्वितीय आला आहे. तालुक्याचा निकाल ८५.९४ टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा निकालात तीन टक्केची घट आली आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेला वणी तालुक्यातून २२४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्यातील ४३ शाळापैकी सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

शाळानिहाय निकाल पुढील प्रमाणे
न्यू इंग्लिश हा. पुनवट ९०.४८ टक्के, जी. प. हायस्कूल वणी ६८.७५, एस. पी. एम.हायस्कूल वणी ९०.७१, आदर्श हायस्कूल वणी ७२.७२, जनता विद्यालय वणी ८६.३९, आदर्श हा. घोंसा ८७.०१, जी. प.हा. कुरई ८१.२५, नवभारत हा. उकणी ८१.८१, आदर्श हा. साखरा कोलगाव ७० , विवेकानंद विद्या. नेरड ६५,विवेकानंद विद्या. वणी ७८.९७, गुरुदेव वि. शिरपूर ९१.८३, पंचशील वि. नांदेपेरा ६५.०७, नालंदा वि. वेळाबाई ८२.३५, राष्ट्रीय वि. राजूर ९६.०३, विवेकानंद वि. कायर ८४.९४, बालाजी वि. सावर्ला ९२, लायन्स इंग्लीश मीडीयम स्कूल वणी १००, नुसाबाई चोपने वि. वणी ८३.३३, आदर्श हा. शिंदोला ७९.४८ , आदर्श हा. साखरादरा ८५.७१, लोकप्रिय वि. पेटूर ९२.५०, तुकडोजी महाराज वि. भालर १००, बहुउद्देशीय ग्रामीण विकास विद्या. ब्राम्हणी ४६.६६, जनता वि. मारेगाव( कोरंबी) ९७.८२, ग्रामीण वि. परमडोह ९२.३०, भास्करराव ताजने विद्यालय कळमना९०, गिरजाबाई मा. वि. मंदर ८३.८७ ,वि . पा. मांडवकर वि. तेजापूर ७६.६६, राजर्षी शाहू महाराज हिंदी वि. वणी ८७.५०, सरस्वती माध्यमिक विद्यालय मोहर्ली १००, स्व. बाबा पा.पिंपळकर मा. वि .मेंढोली ८१.२५ , राष्ट्रीय वि. बोर्डा ८७.०९, वणी पब्लिक स्कूल वणी १०० , जगन्नाथबाबा वि. वांजरी ७९.३१,स्व.केशव पा. कातकडे मा. वि. चिखलगाव ५७.५७, साईकृपा मा. वि. मुर्धोनी ९७.३६ , लक्ष्मीबाई राजगडकर मा.आश्रम शाळा शिरपूर ७७.७७, एस. पी. पिंपळकर मा. वि .नायगाव ५०, अनु.जाती विद्यालय परसोडा ९६.४२, संताजी इंग्लीश मी. स्कूल वणी १००, न्यू व्हिजन इंग्लीश मी. स्कूल वणी ९४.११ टक्के,प्रयास इंग्लीश मिडीयम स्कुल कायर १०० टक्के लागला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

 

Previous articleघरातच सुरू होता प्रतिबंधित बियाण्यांचा काळाबाजार
Next articleकाँग्रेसमध्ये शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लॉबिंग!
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे