चंद्रपूर शहराचे वैभव असलेली चंद्रपूरच्या देवी महाकालीची वार्षिक चैत्र यात्रा आजपासून सुरू झाली. चैत्र षष्ठीच्या दिवशी घटस्थापनेने देवी महाकाली यात्रारंभ होते. चार राज्यातील लाखो भाविक चंद्रपूरच्या माता महाकालीच्या दर्शनासाठी दाखल होतात. चंद्रपूरचा कडक उन्हाळा बघता प्रशासनाने रांगेतील दर्शनार्थींसाठी विशेष थंड फवा-याची व्यवस्था केली आहे. यंदा जिल्हा प्रशासनाने यात्रेसाठी अधिकचा परिसर खुला केल्याने सुविधांमध्ये वाढ झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः मराठवाड्यातून आलेल्या भाविकांनी दर्शनानंतर आत्मिक समाधान व्यक्त केले.
व्हिडियो बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा







