Home Breaking News आमदार करन देवतळे यांची प्रथमच निपॉन प्रकल्पग्रस्त धरणे आंदोलन स्थळी भेट, जाणून...

आमदार करन देवतळे यांची प्रथमच निपॉन प्रकल्पग्रस्त धरणे आंदोलन स्थळी भेट, जाणून घेतल्या प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या.

0
43

दिनांक.२ एप्रिल २०२५ ला सायंकाळी पाच वाजता स्थानिक आमदार करन देवतळे यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत चर्चा केली व आपल्या मागण्यांसंदर्भात लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करू व आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे सूचित केले तसेच आंदोलकावरील विविध गुन्हे मागे घेण्यात येईल याबाबत गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष चर्चा करु. तसेच न्यू. एरा कंपनीच्या खोदकामाची चौकशी करून तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येईल असे आमदार करन देवतळे यांनी प्रकल्पग्रस्तांना आवर्जून सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार साहेबांनी सुद्धा १०दिवसांनंतर प्रथमच धरणे आंदोलन स्थळी भेट दिली
यावेळी अनेक महिला, पुरुष प्रकल्पग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here