Home Breaking News शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीमेची चंद्रपुरात सुरुवात तसेच आढावा सभा संपन्न

शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीमेची चंद्रपुरात सुरुवात तसेच आढावा सभा संपन्न

0
22

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने, किशोर राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर, यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीची मोहिमेचे सुरुवात करण्यात आली तसेच सर्व पदाधिकारी यांची आढावा सभा घेण्यात आली.सर्व पदाधिकारी यांनी शिवसेना सदस्य नोंदणी ला प्रथम प्राधान्य देऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याची सूचना देण्यात आली. गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे शिवसेना सदस्य नोंदणी करा आणि पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राय यांनी केले. यावेळी गावपातळीवर पदाधिकारी शिवसैनिकांसोबत जनतेमध्ये जाऊन शिवसेना पक्षसंघटन उभे करण्यास तयार असल्याचे यावेळी ते म्हणाले, या कार्यक्रमाला,जिल्लाप्रमुख महिला प्रतिमा ठाकुर,महानगर प्रमुख भरत गुप्ता,महिला शहर प्रमुख वाणी सदलावर,सीमाताई रामेदवार,अंजू लेनगूरे,उपशहर प्रमुख शैलेश सदलवार,जफर बेग़,तरुण एंगंटीवार,सूचक धकने,मोनिद येरावर,तेजस गानर,नयन जंगम,राजू ऐतलवार,यांची उपस्थिति होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here