-चंद्रपूर शहरात गेले तीन दिवसांपासून नळ पाणीपुरवठा ठप्प आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ईरई धरणातील जॅकवेल यंत्रणा बिघडली आहे. शहराच्या विविध भागात ऐन उन्हाळ्याच्या काळात पाणी नसल्याने हाहाकार बघायला मिळत आहे. चंद्रपूर शहरात महाकाली यात्रेच्या निमित्ताने पुढील काळात हजारो भाविक येणार आहेत. गेले तीन दिवस ठप्प असलेली पाणीपुरवठा योजना पुढील 24 तासातही सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत. मुख्य पाणी टाक्या कोरड्या पडल्याने दूर दुरून पाणी आणण्यासाठी आलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.








