Home Social महाराष्ट्र दिनी ‘वणी वृत्तवेध’चा शुभारंभ

महाराष्ट्र दिनी ‘वणी वृत्तवेध’चा शुभारंभ

◆ डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा

वणी वृत्तवेध :-माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बातम्यांची गती, अचूकता आणि विश्वासार्हता यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर ‘वणी वृत्तवेध’ या नव्या डिजिटल न्यूज पोर्टलचा शुभारंभ होत आहे. वणीसह परिसरातील घडामोडींना तत्परतेने, निष्पक्षपणे आणि जनतेच्या आवाजाला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात येत आहे.

‘वणी वृत्तवेध’ हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बनण्याचा संकल्प आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक घडामोडी तसेच ग्रामीण भागातील महत्त्वाच्या विषयांना योग्य स्थान देत, सत्य आणि तटस्थ पत्रकारितेचा ध्यास ‘वणी वृत्तवेध’ने घेतला आहे.

आजच्या वेगवान युगात सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या पार्श्वभूमीवर, वाचकांना विश्वासार्ह आणि पडताळलेली बातमी देणे ही काळाची गरज बनली आहे. ‘वणी वृत्तवेध’ हे याच गरजेची पूर्तता करत, “जिथे बातमी, तिथे वेध या ब्रीदवाक्याने कार्यरत राहणार आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सुरू होणाऱ्या या पोर्टलमुळे स्थानिक पत्रकारितेला नवी ओळख मिळणार असून, नागरिक, तरुण आणि वाचक यांना आपले मत मांडण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. वणी व परिसरातील नागरिकांनी ‘वणी वृत्तवेध’ला सहकार्य करावे आणि या नव्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Previous articleझेयु ऐलेव्हन संघाने पटकावला मनसे चषक
Next articleकामगार ते उद्योजक: राजाभाऊ बिलोरिया
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे