Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त,वनविभागाची कारवाई

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त,वनविभागाची कारवाई

0
23

भद्रावती :- मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे वनक्षेत्रात अवैध रेतीची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती वनपरिक्षेत्राद्वारे दिनांक पाच रोज शनिवारला सकाळी सात वाजता वनपरिक्षेत्रातील मासळ व तिरवंजा नियत क्षेत्रात करण्यात आली. सदर नियत क्षेत्रात अवैध रेती तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक सदर ठिकाणी पोहोचले. त्यावेळी या नियत क्षेत्रातील नाल्यातून एमएच ३४ बीएफ २५ २३, एमएच ३३ एफ ४०१४, एमएच ३४ सीडी 46 98 व एक नंबर नसलेले ट्रॅक्टर असे चार ट्रॅक्टर अवैध रेती तस्करी करीत असलेले आढळून आले. त्यांच्याजवळ परवाना मागितला असता तो आढळून आला नाही. त्यामुळे हे चारही ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टर मालक अनुक्रमे ओम पिंपळकर राहणार तिरवंजा, अनुराग येरगुडे राहणार तिरवंजा, रुपेश उईके राहणार आष्टी यांचे वर वनगुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात व्ही. व्ही. शिंदे, ए.बी. शेळकी, एस.एस.मेश्राम,जै. एम.माहुलीकर, डी. एम‌.गेडाम, पवन मांढरे, नितीन राऊत, अनिल शेंद्रे, किशोर मडावी, विकास धांडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here