Home Breaking News चंद्रपुरात ४ लाख २० हजाराची लाच स्वीकारताना अटक….. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी...

चंद्रपुरात ४ लाख २० हजाराची लाच स्वीकारताना अटक….. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे, वरिष्ठ सहाय्यक सुशील मारोती गुंडावार, परिचर मतीन शेख यांना ४ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

0
61

चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती येथील ठेकेदारीचा व्यवसाय करणारे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार महाराष्ट्र शासनाच्या “जल जीवन मिशन” कार्यक्रम अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामापैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते, त्यापैकी ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. सदर काढुन दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता बोहरेनी स्वतः करीता ४,००,०००/-रूपयेची मागणी करून सदर रक्कम वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले. तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्वतः करीता २०,०००/- रूपयेची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकुन ४,२०,०००/-रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना ४,२०,०००/-रु. लाच देण्याची ईच्छा नसल्याने बोहरे व सुशील गुंडावार, यांचे विरुध्द ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०७/०४/२०२५, ०९/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना ४,२०,०००/-रु. लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज दिनांक १०/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान सुशील गुंडावार यांनी लाच रक्कम ४,२०,०००/- रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारून त्यापैकी २०,०००/- रूपये स्वतः करीता वेगळे काढुन उर्वरीत ४,००,०००/- रूपये मतीन शेख यांना हर्ष बोहरे यांना देण्यास सांगीतल्याने मतीन शेख यांनी हर्ष बोहरे यांचे घरी नेउन दिली. सदरची लाचरक्कम स्वीकानारे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. नि. जितेंद्र गुरनूले, पो.हवा. हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, पो.अं. अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, म.पो.अं. पुष्पा काचोळे, चा.पो.अं. सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.

आवाहन:–
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here