Home Breaking News Chandrapur.. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२५ रोजी गोव्यात.. chandataknews

Chandrapur.. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२५ रोजी गोव्यात.. chandataknews

0
48

chandataknews

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२५ रोजी गोव्यात.

होणाऱ्या या महाअधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर यांनी केले आहे.

 

 

Goa राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन ७ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, सांताक्रूज, गोवा येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनासाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांना निमंत्रण देण्यात आले असून, केंद्र व राज्यातील प्रमुख पाहुण्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.

या अधिवेशनाच्या निमित्ताने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

 

जातनिहाय जनगणना तात्काळ करावी

आरक्षणाची मर्यादा ५०% वरून हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे

ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटचे वाटप व स्वतंत्र केंद्रीय ओबीसी मंत्रालय स्थापन करावे

राजकीय आरक्षणासाठी संविधानात सुधारणा करून २७% आरक्षण लागू करावे

क्रिमी लेयरची मर्यादा वाढवावी आणि घटनाबाह्य अट रद्द करावी

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, शिष्यवृत्ती, व व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू कराव्यात

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार द्यावा

शेतकरी व शेतमजुरांसाठी पेन्शन योजना लागू करावी

सरकारी नोकरभरतीतील ओबीसी रिक्त पदे तात्काळ भरावीत

ओबीसींसाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात समावेश करावा

कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट व स्मार्टगाव योजना लागू करावी

ओबीसी, एससी, एसटीसाठी आरक्षण विधेयक ९व्या अनुसूचीत समाविष्ट करावे

गोवा राज्यातील ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, शैक्षणिक वसतिगृहे, आरोग्य योजना, विवाह प्रोत्साहन योजना, आणि व्यावसायिक शिक्षणासाठी विशेष योजना लागू करण्याच्या मागण्या अधिवेशनात मांडल्या जाणार आहेत.

 

या महाअधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, गोवा अध्यक्ष मधु नाईक, महासचिव सर्वेश बंदोडकर, उपाध्यक्ष नोनू नाईक, गुरुदास सवाल, प्रसाद नागवेकर, बेनी झेवियर, नौभत वैद्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here