Home Breaking News Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील लॉयट्स मेटल अँड एनर्जी प्रकल्पावर गंभीर प्रदूषणाचे...

Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील लॉयट्स मेटल अँड एनर्जी प्रकल्पावर गंभीर प्रदूषणाचे आरोप, पर्यावरण मंजुरी रद्द करण्याची होत आहे मागणी

0
31

Chandataknews

Chandrapur

चंद्रपूर – घुग्घुस एम.आय.डी.सी. परिसरातील लॉयट्स मेटल अँड एनर्जी लि. या प्रकल्पावर गंभीर वायू आणि जलप्रदूषणाचे आरोप करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची पर्यावरण मंजुरी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी पर्यावरण व सामाजिक संस्था तर्फे करण्यात आली आहे.पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी विनय गौडा, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबईचे सदस्य सचिव यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संस्थेच्या तक्रारीनुसार, प्रकल्पातून निघणारा जड धातू, क्रोमियम, सिसे आणि इतर रसायनयुक्त कचरा मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ५ जून २०२१ रोजी प्रकल्पाला CHWTSDF किंवा एमआयडीसी ताडाळी येथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. तरीही प्रकल्पाकडून हा घाणकचरा कोळसा डेपो व अन्य केंद्रात विक्री करून वापरला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण निर्माण होऊन मानवी आरोग्यास धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, कोळसा व लोहखनिज हाताळणी, सायलो लिकेज, तसेच भारी वाहतुकीमुळे हवेत सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत या परिसरात घातक वायु प्रदूषण तीव्र प्रमाणात होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात तत्काळ निलंबनाची मागणीही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here