Home Political Chandrapur.. चंद्रपूर भाजपा महानगरचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या भूमिपूजन समारंभास नागरिकांचा...

Chandrapur.. चंद्रपूर भाजपा महानगरचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या भूमिपूजन समारंभास नागरिकांचा कडाडून विरोध……  

0
108

चंद्रपूर भाजपा महानगरचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांच्या भूमिपूजन समारंभास नागरिकांचा कडाडून विरोध……

भूमिपूजन कार्यक्रमाच्या निषेधाचे बॅनर हाती घेत द्वारका नगरीचे नागरिक एकवटले….

 

पुराचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे बांधकाम आधी करा द्वारका नगरी वासियांची मागणी……

आमदारांच्या मध्यस्थीने तणाव निवळला…..

 

पुराचे पाणी वाहून नेणारा नाला आणि भूमिगत नाल्यांचे बांधकाम एकाच वेळी सुरू करू आमदारांनी दिले आश्वासन. भूमिपूजन कार्यक्रम रद्द करत स्नेह मिलन कार्यक्रमातून आमदारांनी साधला नागरिकांशी संवाद. चंद्रपूर मधील तुकुम प्रभाग क्रमांक एक मध्ये द्वारका नगरी येथील 1 . 33 कोटी रुपयांच्या भूमिगत नाल्यांच्या बांधकामासाठी आमदारांनी निधी उपलब्ध करून दिला.

या औचित्ताने प्रभागातील माजी नगरसेवक तथा सध्या भाजपाचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष म्हणून परिचित असलेल्या सुभाष कासनगोट्टूवार यांनी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. द्वारका नगरी वासियांनी मात्र या कार्यक्रमाला विरोध करत भूमिगत नाल्या केल्यास पुराचा फटका वाढेल त्यामुळे आधी पुराचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे बांधकाम हाती घेणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका आमदारांसमोर मांडली. आमदार किशोर जोरगेवार यांनी द्वारका नगरी वासियांचा मुद्दा ऐकून घेत येत्या चार दिवसात या संदर्भात जिल्हाधिकारी महाजनको यांच्यासोबत बैठक लावून पुराचे पाणी वाहून देणाऱ्या नाल्याचे काम आधी हाती घेऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर मात्र भूमिपूजन कार्यक्रम रद्द करत त्याच ठिकाणी दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रम घेत आमदारांनी नागरिकांशी संवाद साधला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here