Home Breaking News Chandrapur… विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार ॲक्शन मोडवर

Chandrapur… विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार ॲक्शन मोडवर

0
32

Chandrapur

Chandataknews

 

विजयराव वडेट्टीवार यांचा आक्रमक पवित्रा

गोसेखुर्द उजवा कालवा प्रश्नावरून १५ दिवसांत पाणी न मिळाल्यास जनआंदोलनाचा इशारा

 

 

ब्रम्हपुरी – गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामातील संथ गती आणि पाणीपुरवठ्याच्या उशीराबाबत आज विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार ॲक्शन मोडमध्ये आले. ब्रम्हपुरीतील गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यालयावर शेतकऱ्यांसह धडक देत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कामात सत्ता पक्षातील नेत्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी थेट मुख्य अभियंता गवळी यांच्याशी संपर्क साधत पंधरा दिवसांत पाणी उपलब्ध न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला.

गेल्या वर्षभरापासून गोसेखुर्दच्या आरबीसी कॅनलचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने जवळपास १५ हजार हेक्टर शेतीला त्याचा फटका बसला आहे. रब्बी व उन्हाळी हंगामातील धान पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या या कामावर तब्बल २५० कोटींचा अंदाजित खर्च असून, आजपर्यंत फक्त १० टक्के कामच पूर्ण झाले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम सर्ला व खडतकर या कंपनीकडे असून सत्ता पक्षातील एका नेत्याचा कंत्राटात सहभाग असल्याने अडथळे निर्माण होत आहेत. या खुलाशावर आ. वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना फटकारले. त्यांनी तातडीने मुख्य अभियंता गवळी यांच्याशी फोनवर चर्चा करून “शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला.

मुख्य अभियंता गवळी यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना अल्पावधीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी आपले निवेदन कार्यकारी अभियंता संदीप हासे यांना सादर केले.

या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सभापती डॉ. राजेश कांबळे, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

गोसेखुर्द हा विदर्भातील सर्वात मोठा जल प्रकल्प असून, त्याच्या उभारणीसाठी तत्कालीन काँग्रेस सरकार आणि आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ५ हजार कोटींचा निधी मिळाला होता. या प्रकल्पामुळे विदर्भातील लाखो हेक्टर शेती ओलिताखाली आली. मात्र उजव्या कालव्याच्या संथ कामगिरीमुळे ब्रम्हपुरी आणि लगतच्या शेतकऱ्यांना अद्याप पुरेसा लाभ मिळालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here