Chandrapur
Chandataknews
लोहारा येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.
हॉटेल ताडोबा अतिथी इनमध्ये कुंटणखान्यावर छापा; एक महिलेची सुटका
चंद्रपूर, दि. 31 ऑक्टोबर — स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोहारा येथील हॉटेल ताडोबा अतिथी इनवर धाड टाकून सुरू असलेले कुंटणखाने उध्वस्त केले. या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेला सुटका करून देत मुख्य आरोपी लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय 26 वर्षे, रा. अलवर, राजस्थान) याला अटक केली आहे. आरोपी हा हॉटेलचा मॅनेजर असून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून देहव्यापाराचा धंदा चालवीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून हॉटेलवर धाड टाकली. छाप्यात गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 7 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष पोलिस अधिकारी अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखालील पथकात पो.उ.नि. संतोष निंभोरकर, पो.उ.नि. सुनील गौरकर, स.फो. धनराज कारकाडे, पो.हवा. सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, पो.अ. प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम आणि महिला पोलिस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तीतरे यांचा समावेश होता.
या वेळी समाजसेविका सरिता मालू, रेखा भारसकडे तसेच एनजीओ चंद्रपूर यांनीही सहकार्य केले.या कारवाईनंतर पोलिसांनी सर्व लॉजिंग आणि हॉटेल व्यावसायिकांना इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे अवैध कुंटणखाने चालविण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.








