Home Breaking News श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा*…

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा*…

0
65

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा

*श्री अक्कलकोट स्वामी समर्थ परिवार ट्रस्ट, चंद्रपूर* तर्फे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा दि.३१ मार्च २०२५, सोमवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल.
सकाळी स्वामी समर्थ महाराजांचा षोडशोपचारे अभिषेक व त्यानंतर वस्त्रालंकार पूजन करण्यात आले.
१०:३० वाजता नैवेद्य आरती करून लगेचच श्री स्वामी समर्थ महाराज चरीत्र सारामृत पोथीचे सामूहिक पारायण करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला असंख्य भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दुपारी भजन मंडळींनी भजनाचा कार्यक्रम पार पडला.

सायंकाळी ठीक ७ वाजता आरती करून बुंदि चा प्रसाद वाटप करण्यात आला.

मंदिर हे दर्शनासाठी साडे दहा पर्यंत उघडे होते त्यामुळे भाविक व भक्तगणांचा मोठा जनसागर उसळला होता. यात सर्व सेवेकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता श्री स्वामी समर्थ परिवार ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा ताई देशकर, उपाध्यक्ष श्री मोहन ठाकरे, सचिव श्री अनिल गटलेवार, नंदू भाऊ चौधरी, जयदीप देशकर सचिन शिवणकर, मनीष गायकवाड, गोविंदराव बगडे, क्षितिज खांडरे, सौरभ जोशी, वर्षा गटलेवार, वंदना चौधरी, सीमा चन्ने,रंजना पिंपळे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here