Home Social Chandrapur..मोहरमनिमित्त चंद्रपूर शहरातील वाहतुकीत आज बदल…chandataknews

Chandrapur..मोहरमनिमित्त चंद्रपूर शहरातील वाहतुकीत आज बदल…chandataknews

0
43

 

 

 

Chandrapur मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत आज, ६ जुलै रोजी, सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. मोहरमच्या मिरवणुकीमुळे शहरातील काही मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. chandataknews

 

वाहनांसाठी बंद असणारे मार्ग:

अंचलेश्वर गेट

गिरणार चौक

सोमेश्वर मंदिर ते गिरनार चौक

संजय लस्सी सेंटर ते गिरनार चौक

 

पर्यायी मार्ग (वाहनधारकांसाठी):

अंचलेश्वर गेटपासून कोहिनूर तलाव, मीलन चौक, गांधी चौक

सोमेश्वर मंदिर-मीलन चौक-गांधी चौक

एसबीआय बँक (संजय लस्सी सेंटर) गोल बाजार-गांधी चौक

एसबीआय बँक कुबेर दवाखाना-अंचलेश्वर गेट

 

पोलीस विभागाने वाहनधारकांना वरील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोहरमच्या मिरवणुकीमुळे बंद केलेल्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

 

चंद्रपूर शहरातील हजरत मखदुम शाहबुद्दिन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या काळात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून मोहरम सण उत्साहात साजरा केला जातो आणि दर्ग्यातील दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती असते.

 

शहरातील नागरिकांनी आणि वाहनधारकांनी पोलीस विभागाने दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here